About us
  About META  
  Objectives  
  Organization Setup  
  Right to Information  
  नागरी सनद  
  Contact Information  

 

नागरिकांची सनद

   

१.  प्रस्तावना-

महाराष्ट्र अभियांत्रिकी प्रशिक्षण प्रबोधिनी, नाशिक महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागातील एक महत्वाचा विभाग आहे. हा विभाग नागरिकांना खालील सुविधा पुरविण्यास बांधिल आहे. ही बांधिलकी महाराष्ट्र अभियांत्रिकी प्रशिक्षण प्रबोधिनी,नाशिक या सनदेद्वारे जाहीर करीत असून ती स्विकारत आहे. सार्वजनिक सेवा तत्परतेने, सौजन्यपूर्वक व सन्मानपूर्वक वागणूक मिळून उपलब्ध व्हाव्यात व नागरिकांचे सामाजिक प्रश्न सहानुभूतिपूर्वक सोडवावे हा दृष्टीकोन ही सनद तयार करतांना नजरेसमोर ठेवत आहे.

महाराष्ट्र अभियांत्रिकी प्रशिक्षण प्रबोधिनी चा संबंध मुख्यत्वेकरुन शासकीय व निमशासकीय सेवेतीली अभियंत्यांशी प्रशिक्षण व व्यावसायिक परीक्षा या निमित्ताने येतो. तरीपण या विभागाशी संबंधित विषयातील माहिती समाजातील कोणीही सर्वसामान्य जागरुक नागरिक, स्वयंसेवी संस्था इ.ना मिळवून घेण्याची इच्छा असू शकते. या विभागामार्फत तयार करण्यात आलेल्या या नागरिकांच्या सनदेचा मुख्य उद्देश हा वरील संबंधित माहितीचे स्वरुप काय असेल, ही माहिती कोणत्या अधिका-याकडे मिळेल व मिळविण्यासाठी किती कालावधी लागेल याची निश्चित ग्वाही देणे व त्याप्रमाणे अंमलबजावणी करणे हा आहे.

 1. या संस्थेमार्फत जलसंपदा व सार्वजनिक बांधकाम विभागातील सरळसेवा प्रविष्ट वर्ग १ व वर्ग २  अभियंत्यांना प्रशिक्षण देण्यात येते. तसेच खात्यातील कार्यरत अभियंत्यांना तांत्रिक, प्रशासकीय, लेखा व मनुष्यबळ विकास या विषयांचे प्रशिक्षण देण्यात येते. त्या दृष्टीने संबंधित माहिती यात अंतर्भूत करण्यात आली आहे.

 2. या संस्थेमार्फत जलसंपदा व सार्वजनिक बांधकाम विभागात कार्यरत सहा. अभियंता श्रेणी १, सहाय्यक कार्यकारी अभियंता, उप विभागीय अभियंता,  शाखा अभियंता, कनिष्ट अभियंता व स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक यांच्या दरवर्षी व्यावसायिक परीक्षा घेण्यात येतात. त्यादृष्टीने संबंधित माहिती या अंतर्भूत करण्यात आली आहे.

 3. सर्व कार्यालयात प्रतिसाद वेळापत्रक प्रदर्शित करणे.

 4. सर्व कार्यालयांतून कर्मचारी वर्गाची कर्तव्ये व जबाबदा-या फलकावर जाहीररित्या प्रदर्शित करणे.

 5. कार्यलयात ठरवून दिलेल्या दिवशी व वेळी सर्वसामान्य जनतेची गा-हाणी/तक्रारी ऐकणे व त्यांचे प्रभावीपणे निराकरण करणे.

 6. माहितीचा अधिकार अधिनियम अंतर्गत मागितलेली माहिती संबंधितांना विहीत मुदतीत उपलब्ध करुन देणे.

 7. विभागाच्या कामकाजात सातत्य ठेऊन व आधुनिकता आणून विभागाची लोकभिमुखता वाढविणे.

 8. नागरीकांच्या सनदेस व्यापक प्रसिध्दी देणे.

 9. संस्थेचे संकेतस्थळ (Website) कार्यान्वित झाले आहे. (www.metanasik.org.) सदर माहिती विभागामार्फत त्यांचे संकेतस्थळी ठेवण्यात आली असून ती नियमित अद्ययावत केली जाते. जागरुक नागरिक, स्वयंसेवी संघटना, इंटरनेटच्या माध्यमातून देखील वरील माहिती घेऊ शकतात.


२.  १. बांधिलकी-

वरील सर्व कर्तव्ये पार पाडतांना संस्था-

सेवेच्या गुणवत्तेची बांधिलकी ठेवील
सौजन्यपूर्ण व मदतीची वृत्ती ठेऊन कामाच्या वेळेत निपटारा करेल.
पारदर्शकता व निष्ठा ठेवील.

यासाठी वेळोवेळी विविध माहिती नागरिकांना उपलब्ध करण्यात येईल.

२. नागरिकांची जबाबदारी-

 •  शासकीय अधिकारी/कर्मचारी यांच्याशीनागरिकांची वर्तणूक सौजन्यपूर्वक असावी.

 • नागरिकांकडून आवश्यक असलेली माहिती व कागदपत्रे परिपूर्णरित्या मिळावी.

 • नागरिकांचा प्रतिसाद विकासाला मदत करणारा असावा.

 • विहीत केलेल्या कालावधीपेक्षा कमी कालावधीत सेवा पुरविण्याचा आग्रह धरु नये.

 •  नागरिकांनी कायदेशीर तरतुदी,नियम,अलिखित संकेत यांचे पालन करावे.


३.

 संस्थेचे उद्दिष्ट व रचना-

अ) उद्दिष्टे-
 1. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत निवड होणा-या वर्ग १ व वर्ग २ अभियांत्रिकीअधिका-यांना खात्यातील कामकाजाचे पायाभूत प्रशिक्षण देणे.

 2. शासकीय व निमशासकीय विभागातील विशेषत: जलसंपदा व सार्वजनिक बांधकाम विभागातील कार्यरत कनिष्ट अभियंता, शाखा अभियंता, सहाय्यक अभियंता श्रेणी २, सहाय्यक अभियंता श्रेणी १,  सहाय्यक कार्यकारी अभियंता, कार्यकारी अभियंता व अधीक्षक अभियंता स्तरावरील अधिका-यांना तांत्रिक, प्रशासकीय, लेखा व मनुष्यबळ विकास याबाबतचे प्रशिक्षण देणे.

 3. शासकीय व निमशासकीय विभागातील मुख्यत: जलसंपदा व सार्वजनिक बांधकाम विभागातील नवीन नियुक्त झालेल्या सहाय्यक कार्यकारी अभियंता, सहाय्यक अभियंता श्रेणी १, सहाय्यक अभियंता श्रेणी २ तसेच खात्यामधील कनिष्ट अभियंता, स्थापत्य अभियंता सहाय्यक व्यावसायिक परीक्षा दरवर्षी घेणे.


ब) संस्थेची रचना -

संस्था मा. महासंचालक, संकल्पन, प्रशिक्षण, जलविज्ञान, संशोधन व सुरक्षितता, मेरी, नाशिक व मा. मुख्य अभियंता, संकल्पन, प्रशिक्षण, संशोधन व सुरक्षितता, म.अ.प्र.प्र., नाशिक यांच्या अधिपत्याखाली कार्यरत आहे.

संस्थेचे प्रशासकीय कार्यालय नाशिक येथे आहे. संस्थेत प्रशिक्षण व व्यावसायिक परीक्षा हे दोन मुख्य शाखा असून ते उप संचालक (व्यावसायिक परीक्षा) व अधीक्षक अभियंता व सहसंचालक (प्रशिक्षण) यांच्या अधिपत्याखाली कार्यरत आहेत. संस्थेतंर्गत प्रादेशिक प्रशिक्षण केंद्र, पुणे, औरंगाबाद व नागपूर या ठिकाणी प्रशिक्षण केंद्रे आहेत. या प्रादेशिक प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख कार्यकारी अभियंता व प्राचार्य हे आहेत. नाशिक येथील प्रशिक्षण संस्थेत उप अभियंता व कार्यकारी अभियंता या स्तरावरील अधिका-यांना प्रशिक्षण देण्यात येते. प्रादेशिक प्रशिक्षण केंद्रात सहाय्यक अभियता श्रेणी २, शाखा अभियंता,कनिष्ट अभियंता स्तरावरील अधिका-यांना प्रशिक्षण देण्यात येते.

४.      कार्यपूर्तीचे वेळापत्रक-

प्रशिक्षण प्रबोधिनी,नाशिक व प्रादेशिक प्रशिक्षण केंद्र, नागपूर, पुणे व औरंगाबाद येथील प्रशिक्षण कार्यक्रमांचे नियोजन दरवर्षी साधारणत: जुलै महिन्यात सर्व क्षेत्रिय मुख्य अभियंता यांच्या बैठकीत करण्यात येते व ते संस्थेच्या संकेत स्थळावर देण्यात येते.

व्यावसायिक परीक्षा संस्थेमार्फत दरवर्षी घेतल्या जातात. सहा.कार्यकारी अभियंता याची व्यावसायिक परीक्षा वर्षातून एकदा नाशिक येथ घेतली जाते. उप अभियता किंवा तत्सम पदे यांची व्यावसायिक परीक्षा वर्षातून एकदा नाशिक,पुणे,औरंगाबाद आणि नागपूर या चार केंद्रावर घेतल्या जातात. सहा.अभियंता श्रेणी २/कनिष्ट अभियंता यांची व्यावसायिक परीक्षा ठाणे, जळगांव, अकोला, अमरावती, चंद्रपूर, नांदेड, कोल्हापूर, रत्नागिरी, सातारा, अहमदनगर, बीड व नाशिक या बारा केंद्रांवर घेतल्या जातात. या परीक्षा स्थापत्य/यांत्रिकी/विद्युत या तिन्ही शाखांसाठी घेतल्या जातात.

नैसर्गिक आपत्ती,कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न इ. उद्भवल्यास या वेळापत्रकातील कालावधीत बदल होऊ शकतो.


५.  अ) नागरिकांच्या सनदेचा आढावा/ सिंहावलोकन

या नागरिकांच्या सनदेच्या उपयुक्ततेबाबत संस्थेकडून वेळोवेळी आढावा घेण्यात येईल.

) जनसामान्यांकडून सूचना-
ही नागरिकांची सनद सर्वसामान्य नागरिकांच्या छाननीसाठी नेहमीच खुलीर असेल व सन्माननीय नागरिकांच्या बहुमूल्य सूचनांचा गांभिर्यपूर्वक विचार करुन त्यात वेळोवेळी सुधारणा घडवून आणता येईल. ही नागरिकांची सनद स्वत:हून काही नवीन कायदेशीर हक्क निर्माण करीत नाही. ती ग्राहकांना म्हणजेच संस्थेच्या सेवा उपभोगणा-या नागरिकांना जादा हक्क मांडण्यासाठी मदत करते.
६.  नागरिकांच्या सनदेची अंमलबजावणी-

म..प्र.प्र.या नागरिकांच्या सनदेची अंमलबजावणी १/१/२०१२ पासून करण्यास कटीबध्द आहे.

सनदेस व्यापक प्रसिध्दी देऊन नागरिकांच्या प्रतिक्रिया/अभिप्राय मागविण्यात येतील व त्यांच्या सूचनांचा यथोचित आदर करुन आवश्यक बदल करण्यात येतील.

म..प्र.प्र.,नाशिक खात्रीपूर्वक गुणवत्तेची सेवा पुरविण्याची हमी देत आहे. संस्थेच्या कुठल्याही माहितीसाठी नागरिकांना संवेदनशील, सौजन्यपूर्ण मदत करण्याच्या भावनेने वर्तणूक मिळेल. कार्यपध्दती अधिक लोकाभिमुख,सुलभ व आटोपशीर करण्यासाठी नागरिकांचा सल्ला घेतला जाईल. भ्रष्टाचारास आळा घालण्यात येईल तसेच नागरिकांच्या गा-हान्याचे कालबध्द निराकरण करण्यात येईल.


परिशिष्ट अ 

महाराष्ट्र अभियांत्रिकी प्रशिक्षण प्रबोधिनी,नाशिक नागरिकांची सनद

अक्र

परीक्षेचे नांव वारंवारिता

निकाल प्रक्रिया कालावधी

  १.

राजपत्रित अधिकारी
उप विभागीय  अभियंता, उपविभागीय अधिकारी, सहा.कार्यकारी अभियंता/ सहा.अभियता श्रेणी यांची व्यावसायिक परीक्षा

वर्षातून वेळा ते महिने
  २.

कनिष्ट अभियता (स्थापत्य/यांत्रिकी/ विद्युत) या पदाची व्यावसायिक परीक्षा

वर्षातून वेळा ते महिने
  ३.

स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पदाची व्यावसायिक परीक्षा

वर्षातून वेळा ५  ते ६ महिने
टि- प्रशासकीय अडचणी किंवा इतर अपरिहार्य कारणामुळे वरील निकाल प्रक्रिया कालावधीत बदल होऊ शकतो

 

 

 

परिशिष्ट ब 

महाराष्ट्र अभियांत्रिकी प्रशिक्षण प्रबोधिनी, नाशिक ४ संघटन तक्ता    

 


Home | About us | Objectives | Right To Information | Organisation | Contacts RTCs  | Training Calendar Downloads